⁠
Jobs

PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत नोकरीचा गोल्डन चान्स, 320 पदांवर भरती

PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिका मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहवी PMC Recruitment 2023

एकूण जागा : 320

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी. 02) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
2) वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी- 20
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.) 02) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
3) उपसंचालक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण 02) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
4) पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – 02
शैक्षणिक पात्रता
: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
5) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक- 20
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका. 02) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
6) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – 40
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. 02) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. 03) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
7) कनिष्ठ अभियंता (विद्युत)- 10
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका. 02) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
8) वाहन निरीक्षक – 03
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण. 03) आर. टी. ओ. जड वाहन परवाना. 04) मोटार वाहन कायदा विषयी माहिती. 05) पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
9) मिश्रक / औषध निर्माता – 15
शैक्षणिक पात्रता
: 01) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण. 02) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म) 03) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य 04) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
10) पशुधन पर्यवेक्षक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. 02) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण. 03) पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
11) अग्निशामक विमोचक / फायरमन – 200
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. 03) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. 04) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000/- रुपये
मागासप्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900/- रुपये

इतका पगार मिळेल :
क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – ६७७००-२०८७००
वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी – ५६१००-१७७५००
उपसंचालक – ४९१००-१५५८००
पशु वैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2) – ४१८००-१३२३०
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – २३ : ६७७००-२०८७००
आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक (श्रेणी – 3) – ३५४००-११२४००
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – ३८६००-१२२८००
वाहन निरीक्षक – ३५४००-११२४००
मिश्रक / औषध निर्माता – २९२००-९२३००
पशुधन पर्यवेक्षक – २५५००-८११००
अग्निशामक विमोचक / फायरमन – १९९००-६३२००

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 एप्रिल 2023 30 एप्रिल 2023 (11:59 PM)
शुद्धिपत्रक पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button