सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२१ आहे.
एकूण जागा : ०१
पदाचे नाव : उच्चश्रेणी लघुलेघक/ Higher Grade Stenographer
शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र.
०२) उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक. मराठी लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक. त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य.
वयोमर्यादेची अर्हता :
१. अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे कमाल वयोमर्यादा ही ६५ वर्षापेक्षा अधिक नसावे.
शुल्क : १००/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर, अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे – ४११०११.
करार पध्दतीने करावयाच्या नियुक्तीबाबत अटी व शर्ती :
१. करार पध्दतीने नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात येईल. परंतू अशा नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी आवश्यकतेनुसार नुतनीकरण करता येईल आणि एकूण कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक असणार नाही.
२. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या एकूण वेतनातून (मूळ वेतन व महागाई भत्ता धरुन) त्यांना आता मिळत असलेले एकूण निवृत्तीवेतन (महागाई भत्ता आणि अंशराशीकृत निवृत्तीवेतनासह) वजा केल्यानंतर होणारी रक्कम त्यांचे मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात येईल. अशा पारिश्रमिक रक्कमांची कमाल मर्यादा मासिक रु.४०,०००/ (रुपये चाळीस हजार) इतक्या मर्यादेत असेल.
३. पारिश्रमिक रक्कमेची गणना करणेकामी सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेले एकूण वेतन व आता मिळत असलेले एकूण निवृत्तीवेतन यासंबंधातील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
४. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत / हक्क नसेल.
५. असा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी शारिरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
६. नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र रु.१००/- चे नोंदणीकृत स्टॅम्पपेपरवर नियुक्तीच्या वेळी देणे आवश्यक आहे. तसेच सदर बंधपत्रात / हमीपत्रात करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाने व विभागाने निश्चित केलेल्या अटी व शर्ती, करार पध्दतीवरील उमेदवारांकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही, यांचा समावेश करुन सदर अटी व शर्ती मान्य असल्याचा उल्लेख करारात करण्यात यावा.
७. अशा अधिकारी/कर्मचा-याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी.
८. नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकारी/कर्मचारी यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
९. असा अधिकारी/कर्मचारी त्यांच्यावर सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल. अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.
१० अशा अधिकारी/कर्मचारी यांनी conflict of interest जाहीर करणे आवश्यक राहील.
११. अशा अधिकारी/कर्मचारी यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्तीवेळच्या वेतनमानास अनुसरुन प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील..
१२. अशा करार पध्दतीवरील अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांना प्राप्त होणा-या कागदपत्रे/माहिती व आधारसामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील.
अधिकृत संकेतस्थळ : www.mahapwd.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा