⁠  ⁠

Railway Bharti : रेल्वेत ”असिस्टंट लोको पायलट” पदांसाठी बंपर भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वे विभागातर्फे मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सहाय्यक लोको पायलट पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.  इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 7 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होतील.

एकूण रिक्त पदे : 238
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
शैक्षणिक पात्रता : असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं, (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
किंवा
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो.

वयोमर्यादा –खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं. OBC प्रवर्गातील 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 7 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मे 2023

click here

अधिकृत संकेतस्थळ : www.rrcjaipur.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article