रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. रेल्वे दरवर्षी अनेक पदांसाठी भरती करते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, भारतीय रेल्वेने २०२४ आणि २०२५ या कॅलेंडर वर्षात १,२०,५७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मागच्या ११ वर्षात रेल्वेने ५.०८ लाख उमेदवारांना नोकऱ्या दिल्या असल्याचंही ते म्हणाले.
भारतीय रेल्वे ही खूप मोठे आहे.रेल्वेच्या कामकाजाविषयीचे गांभीर्य लक्षात घेवून, रिक्त पदे निर्माण होणे आणि त्यांची भरती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियमित कामकाज, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि नवीन पद्धती यामुळे नवीन पदांसाठी भरती केली जाते. रिक्त पदे प्रामुख्याने रेल्वेकडून भरती संस्थांकडे कार्यात्मक आणि तांत्रिक गरजेनुसार मागणी पाठवून भरली जातात.
सध्या भारतीय रेल्वेमध्ये 2024 आणि 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 1,20,579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्तर-1 श्रेणीतील 32,438 रिक्त पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) परीक्षा १४० भाषांमध्ये झाली आहे. रेल्वे संरक्षण दलासाठी (आरपीएफ) हवालदार (कॉन्स्टेबल) पदाच्या 4,208 रिक्त पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) १३ नोव्हेंबर पासून सुरू झाली.
तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, पॅरामेडिकल श्रेणी, उपनिरीक्षक (आरपीएफ) आणि सहाय्यक लोको पायलट या पदांसह विविध पदांसाठी 23,000 हून अधिक उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. याशिवाय, 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 28,463 रिक्त पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे भरती बोर्डाच्या अत्यंत परीक्षा तांत्रिक स्वरूपाच्या असतात ज्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधनांची तजवीज आणि प्रशिक्षण आवश्यक असते. रेल्वेने या सर्व आव्हानांवर मात केली आणि सर्व निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. मागच्या ११ वर्षात रेल्वेने ५.०८ लाख उमेदवारांना नोकऱ्या दिल्या आहेत.







