महाराष्ट्रात लवकरच 7231 पदांची पोलीस भरती : दिलीप वळसे पाटील
राज्यात 7231 पदांची पोलीस भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात पोलीस भरतीची ती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. तर, काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरु आहे. तर, येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया दिवसात पूर्ण करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात उत्तर दिलं. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलीस विभागाच्या पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) पदाच्या भरतीसंर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरु करण्यात येईल. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज्याच्या पोलीस दलातील 7231 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं आणखी पदांची भरती करण्यात येईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
5200 पदांची भरती अंतिम टप्प्यात
राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरु आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळं येत्या काही काळात 5200 पदांवर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी संधी
महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी 7231 पदांची भरती करण्यात असल्याचं सांगितलं आहे. ही भरती होताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
हे पण वाचा :
- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरीची संधी; 266 पदांसाठी भरती
- शेतकऱ्याच्या मुलीची जलसंपदा विभागात निवड; वाचा प्रणाली पाटीलची यशोगाथा
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती; पात्रता जाणून घ्या..
- INCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात विविध पदांची भरती
- नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये विविध पदांच्या 518 जागांसाठी भरती