SAIL : स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये 356 जागांसाठी भरती
Sail Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. SAIL मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना sailcareers.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 356
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
ट्रेड अप्रेंटिस -165 जागा
तंत्रज्ञ शिकाऊ -135 जागा
पदवीधर शिकाऊ -53 जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड अप्रेंटिससाठी उमेदवारांनी आयटीआय परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तर अभियांत्रिकी डिप्लोमा असलेले उमेदवार टेक्निशियन अप्रेंटिससाठी अर्ज करू शकतात. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी, BE/B.Tech मध्ये ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण केलेले उमेदवार फॉर्म भरण्यास पात्र आहेत. उमेदवार भरती सूचनेमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील तपासू शकतात.
वयोमर्यादा : 18 ते 28 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. 30 सप्टेंबर 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.
या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. मेरिट बेसवर उमेदवारांची निवड केली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांनी स्टायपेंड दिली जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
ट्रेड अप्रेंटिस : येथे क्लीक करा
तंत्रज्ञ शिकाऊ : येथे क्लीक करा
पदवीधर शिकाऊ : येथे क्लीक करा