आपल्या आयुष्यात कधी यश मिळते तर कधी अपयश मिळते. परिस्थिती बदलणे हे आपल्या हातात असते.तसेच या दोन भावांनी करून दाखवले. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावची ही भावंडं. हे संपूर्ण कुटुंब शेतीकाम व मजुरीवर अवलंबून… त्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
तरी देखील दोघांनी आई-वडिलांचे कष्ट आणि राबणारे हात पाहून दोघा भावंडांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.दोघा मुलांपैकी संदीपने बी.ए पूर्ण करून मेकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तर आकाश बी.ए पदवी घेतली आहे.परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी जिद्द आणि चिकाटी व मेहनतीच्या जोरावर परीक्षांना तोंड दिले तर यश नक्कीच मिळते, हे वरखेड्याच्या दोघा भावंडांनी दाखवून दिले. दोघांनी मिळून अभ्यास केला.
सातत्याने मैदानी सराव देखील केला. यामुळेच त्यांनी सीआरपीएफ दलाच्या भरतीसाठी अर्ज भरला. फेब्रुवारीत लेखी परिक्षा झाली. त्यात दोघेही उत्तीर्ण झाले. पुढचा टप्पा मैदानी परीक्षांचा होता. त्यातही त्यांनी बाजी मारली.दोघे सख्ख्या भावांची केंद्रिय राखीव पोलिस दलात नियुक्ती झाल्याचे वरखेडेसह परिसरातील हे पहिलेच भावंडे ठरले आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या भावंडांनी हे यश मिळवले आहे.