SRPF Recruitment 2022 : राज्य राखीव पोलिस बल मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (SRPF Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण १२०१ जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. भरती प्रक्रिया दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १२०१
पदाचे नाव : राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
युनिट नुसार रिक्त पदसंख्या
1) पुणे SRPF 1 119
2) पुणे SRPF 2 46
3) नागपूर SRPF 4 54
4) दौंड SRPF 5 71
5) धुळे SRPF 6 59
6) दौंड SRPF 7 110
7) मुंबई SRPF 8 75
8) सोलापूर SRPF 10 33
9) गोंदिया SRPF 15 40
10) कोल्हापूर SRPF 16 73
11) काटोल नागपूर SRPF 18 243
12) कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शारीरिक चाचणी पोलीस शिपाई (SRPF):
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.
परीक्षा फी : ४५०/- रुपये [मागास प्रवर्ग – ३५०/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०९ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट : www.mahapolice.gov.in
उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा