Success Story कोणतेही स्वप्न पूर्ण करायला वयाचे आणि परिस्थितीचे बंधन नसते. जर एखादी गोष्ट मनात आणली तर आपण काहीही करू शकतो. प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असते. या क्षमतेच्या जोरावर शंभर टक्के प्रयत्न केले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो .स्पर्धा ही आपली स्वतःचीच असली पाहिजे.
डॉ. वंदना चौधरी यांचे मोठा अधिकारी व्हावं, हे लहानपणापासूनचे स्वप्न होते. पण काळाच्या ओघात राहिलं तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणाले, अगं लहानपणी स्वप्न अपुरं राहिलं म्हणून काय झालं .आता तू ते पूर्ण कर. तेव्हा तर त्यांनी वयाची पस्तीशी ओलांडली होती .कशी परीक्षा देणार? कधी अभ्यास करणार? कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या? क्लिनिक होतं आणि इतरही अनेक अडचणी होत्या; त्याचबरोबर नवीन स्मार्ट पिढी होती असे प्रश्न त्यांनी विचारले तेव्हा त्या मिस्टरांना म्हणाल्या, नाही हो शक्य. पण ते म्हणाले,” अगं प्रयत्न करायला काय हरकत आहे ;तू अभ्यास केला तर यश व पद नाही मिळालं तर ज्ञान तर मिळेल ना”. त्यानंतर त्यांनी जोमाने अभ्यास केला आणि यश संपादन केले.
डॉक्टर वंदना प्रशांत चौधरी या औरंगाबाद येथील वैजापूर गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी होती. त्या दोघी बहिणी व दोन भाऊ आई वडील असे त्यांचे कुटुंब होते.डॉक्टर वंदना यांनी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयातून बीएएमएस ची पदवी मिळवली त्यानंतर प्रॅक्टिस केली. त्यानंतर लग्न, लग्नानंतर मुलगी अशा पद्धतीने त्या आपल्या संसारीक जीवनात रममाण झाल्या होत्या. त्यांची वैद्यकीय प्रॅक्टीस चालू होती अडचणी छोट्यामोठ्या येत होत्या पण त्या अडचणींवर त्यांनी मात करत पुढे वाटचाल सुरु ठेवली.
लहानपणी आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे मोठ बनायचं असेल तर अभ्यास करण्याला गत्यंतर नाही, त्यामुळे जिद्दीने अभ्यास करणारी ही सारी भावंडं त्यांच्या मोठ्या भावाने स्कॉलरशिपच्या जोरावर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. वंदना चौधरी यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील अडचणींचा होता.विक्रीकर निरीक्षक, महिला बालकल्याण या परीक्षा दिल्या त्यामध्येही त्या पास झाल्या .
त्यानंतर २०१५ साली राज्यसेवा मुख्य परीक्षा दिल. त्यामध्ये त्यांना नायब तहसीलदार हे पद मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला त्यांनी ठरवलं की आता क्लास वन अधिकार झाल्याशिवाय थांबायचं नाही. पण, २०१६साली त्यांच्या आयुष्यात पूर्व परीक्षेच्या आधी मोठे संकट आले त्यांचे लहान दीर सिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त होते. ते नेहमी त्यांच्या आई-वडिलांवर म्हणजे सासू-सासर्यांवर चिडायचे, मारायचे. एक दिवस असंच त्यांनी त्यांच्या आईला म्हणजेच डॉक्टर वंदना यांच्या सासूबाईंना मारलं डोक्याला खूप मार लागला. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण , औषध पाणी करणं, त्यांची सेवा सुश्रुषा करणं, यामुळे त्यांना अभ्यासाकडे लक्ष देता आले नाही. परिणामी २०१७ सालच्या पूर्व परीक्षेमध्ये त्यांना यश मिळाले नाही.
पुन्हा त्यांनी जिद्दीने अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांचं काम चालू होतं, अभ्यास चालू होता.अभ्यासक्रमावर फोकस केला. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यामुळे त्यांचा अभ्यासहोता. या वर्षी नक्की क्लास वन ऑफिसर होईल. यामुळे त्यांना आत्मविश्वास वाटत होता आणि झालेही तसेच पूर्व परीक्षेत मध्ये त्यांचा स्कोर २००+ प्लस आला. नवीन पुस्तके नवीन पॉईंट्स काढले. ऑगस्ट पर्यंत त्यांचा मेन्स चा अभ्यास पूर्ण झाला होता. सप्टेंबर मध्ये रिविजन करायची आणि परीक्षा द्यायची असं ठरवलं होतं .मेन्स मध्ये त्यांना चांगला स्कोर मिळाला होता. पण कौटुंबिक अडचणींमुळे इंटरव्ह्यूची तयारी करावीशी वाटेना त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करणं सोडूनच दिलं. त्यांच्या सासूबाई समजावत होत्या तू वेळ वाया घालू नकोस अभ्यासाकडे लक्ष दे. अखेर, डॉक्टर वंदना यांनी इंटरव्यू दिला तो चांगला गेला व त्यात त्यांना हवी ती पोस्ट मिळाली. त्यात त्यांना ACS हे पद मिळालं. माहेर – सासरच्या मंडळींनी या प्रवासात त्यांना खूप पाठिंबा दिला. म्हणून, त्यांना हे पद मिळवणे शक्य झाले.