एखाद्याने खूप मेहनत करावी अन् यश मिळवावं. तशीच गोष्ट जीवन हटेसिंग सिसोदे यांची आहे. जीवन हा जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथील रहिवासी. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच झालं, माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत राहून पूर्ण केले.दहावीनंतर बारावीच्या परीक्षेचा पल्ला गाठताना शालेय खर्च भागविण्यासाठी जीवनने तालुक्याच्या गावावरून पाव आणून गावात पहाटे उठून विकले.
त्यातून आलेल्या पैशांतून शाळेचा खर्च भागवला. मग होती शिक्षक होण्याची. म्हणून डीएड झाल्यावर जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात ‘बीए’ला प्रवेश घेतला. त्याचवेळी जळगावातील खासगी रुग्णालयात ‘वार्डबॉय’ म्हणून नोकरी करीत शिक्षणाचा व राहण्याचा खर्च भागवीत ‘बी.ए.’ पूर्ण केलं. पण भरती काही झालीच नाही. त्यानंतर २०१५ व २०१६मध्ये टीईटी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली.
स्पर्धा परीक्षाही अनेकदा उत्तीर्ण केल्या मात्र, थोड्या गुणांनी यश हुलकावणी द्यायचे.जिद्द कामी यावी अन् घेतलेल्या कष्टाला फळ मिळून अखेर ठरवलेलं ध्येय गाठता आलं, याचा अनुभव येथील सार्वजनिक विद्यालयात नुकतेच शिक्षक म्हणून रुजू झालेले जीवन हटेसिंग सिसोदे यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि सरकारी नोकरी मिळाली.