आपल्याला काही करायची जिद्द असेल तर आपण यात नक्कीच यश मिळवू शकतो. हेच प्रियंका अविनाश शेवाळे हिने करून दाखवले आहे.प्रियांकाचे प्राथमिक शिक्षण नांदगावात व माध्यमिक शिक्ष हेण नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे झाले आहे.
दहावीनंतर अनेक पर्याय समोर होते. मात्र, स्पर्धा परीक्षेच्या ध्यासापायी तिने कृषी क्षेत्रात पदवी प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी व त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी देखील केले. या दरम्यान तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.तिने जास्तीत जास्त अभ्यास हा घरीच केला.
तिच्या घरचे तसे अभ्यासाला पुरक वातावरण होते. सध्या जातेगाव (ता. नांदगाव) येथील मविप्र संस्थेच्या विद्यालयातील शिक्षक अविनाश शिवाजी शेवाळे यांची ही कन्या. त्यामुळे तिला कायम प्रोत्साहन मिळाले. यामुळेच, तिच्या जिद्दीला आणि मेहनतीला यश आले. आधी तिची संभाजीनगर येथे जलसंपदा विभागात (Department of Water Resources) कालवा निरीक्षक, ९ नाशिक येथे कृषी सहाय्यक व जलसंपदा विभागात स्टोअरकीपर या तीन पदांवर निवड झाली आहे. प्रियंका नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर रुजू होणार आहे.