आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. सुरज महादेव मोटे याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे उपजीविकेसाठी तो गॅरेजमध्ये काम करायचा.पहाटे पाच वाजता उठून तो सकाळी आठपर्यंत अभ्यास करत असत, त्यानंतर दुकानात काम करत आणि दुपारी कॉलेजला जात असत. मागील चार वर्षांपासून त्याने या परीक्षेची तयारी केली आहे
सुरजचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण कोरवली येथील देशमुख प्रशाला येथे झाले आहे. परीक्षेची तयारी करत असताना सुरज आपले पंचर दुकानही सांभाळत होता. नेव्ही परीक्षेची तयारी करत त्यांनी आपले कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने नेव्हीची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल सोमवारी लागला आणि त्यात त्याने यश मिळवलं आहे.प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय नेव्हीच्या एस.एस.आर पदावर निवड झाली आहे.