Success Story शिक्षणाची जिद्द अंगी असली तर परिस्थितीवर सहज मात करता येते, हेच मेघा पवारने तिच्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. मेघा ही मूळची आदिवासी परिवारातील आहे. शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पावर ही रहिवाशी आहे.नंदूरबार या दुर्गम जिल्ह्यातील मेघा गणेश पवार हिला कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे.
आदिवासी परिवारातील मेघाला हे यश सहज मिळाले नाही. त्यासाठी विपरीत परिस्थितीचा समाना तिला करावा लागला.मेघाचा आई-वडील भावंड असा परिवार आहे. या परिवाराची सर्व परिवार हा शेतीवर अवलंबून आहे. तिच्या आई वडिलांची मुलीला उच्चशिक्षित करण्याची इच्छा होती. तिने ती यशाचे सर्वोच्च शिखर गाठत पूर्ण केली.
तिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर नंदूरबार शहर आणि जिल्हा बाहेर जाऊन हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षणाचा टप्पा गाठला.
ती दिवसा शेतीमध्ये कामे केली, ट्रॅक्टर चालवले अन् रात्री अभ्यास करायची.मेघा फक्त अभ्यास एक अभ्यास करत नव्हती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव होती. यामुळे सुट्टीच्या दिवशी घरी आल्यावर शेतीत आई वडिलांना हातभार लावायची. ट्रॅक्टर चालवत होती. त्यानंतर दिवसभराच्या कामानंतर रात्री अभ्यास करत होती.तिला परिश्रमाचे फळ मिळाले. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्रात गोल्ड मेडल मिळाले.
आदिवासी परिवारातील विद्यार्थीनी असून तिने आपल्या कर्तृत्वाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. मेघा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना देते. ही अनेक मुलींसाठी खरोखरच प्रेरणादायी बाब आहे.