⁠
Inspirational

परदेशी नोकरी संधी सोडून स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला अन् पोलीस उपअधिक्षक बनला..

करिअरची सुरुवातीलाच एक लाख रूपये पगार….परदेशी नोकरी संधी…किती आरामदायी आयुष्य ना..पण हे जीवन सोडून सय्यदने नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. नुसता अभ्यास केला नाहीतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलीस उपअधिक्षक पद मिळवले.सय्यद अरीब अहमद हा मूळचा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे रहिवासी.

सय्यद अहमद यांचे आयआयटी कानपूरमधून बी. टेक. झाले आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून त्यांनी एमएससी केलं आहे. त्यानंतर त्यांना परदेशी नोकरीची संधी आली.मुलाने आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन चांगली नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण आपण देशाची सेवा करावी अशी सय्यदची इच्छा व ध्यास होता.समजसेवेचा वसा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या पगाराची नोकरी नाकारुन सैन्यात भरती होण्याची तयारी सुरु केली होती.

तयारीसाठी त्यानंतर काही काळानंतर ते दिल्लीला गेले. त्यांनी कसून अभ्यास केला आणि २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ते डीएसपी झाले. यापूर्वी ते पीपीएसची परीक्षा पास झाले होते.नागरी सेवा परीक्षांचा कसून अभ्यास करुन सय्यद अहमद हे पोलीस उपअधिक्षक झाले आहेत. नोकरीत कर्तव्य बजावत असताना सय्यद अहमद हे पारदर्शक काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Related Articles

Back to top button