आपण ज्या परिस्थितीतून येतो…ती परिस्थिती बदलणे देखील आपल्याच हातात असते. हे वरखेडे येथील दोन भावांनी करून दाखवले आहे.संदीप आणि आकाश वरखेडे या दोन सख्ख्या भावांची घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम….शेतीजमीन देखील इतकी नाही.
त्यामुळे त्यांचे आईवडील शेतीकाम व मजूरी करून उदरनिर्वाह करायचे.दोघा मुलांपैकी संदीपने बी.ए पूर्ण करून मेकॅनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तर आकाश बी.एच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ही घरची परिस्थिती बघून आपण उच्च शिक्षित व्हावे आणि सरकारी अधिकारी हदोघा भावंडांनी स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी दोघा भावांनी स्टॉफ सिलेक्शनमार्फत निघालेल्या सीआरपीएफ दलाच्या भरतीसाठी अर्ज भरला. फेब्रुवारीत लेखी परिक्षा झाली. त्यात दोघेही उत्तीर्ण झाले. पुढचा टप्पा मैदानी परीक्षांचा होता. त्यातही त्यांनी बाजी मारली.
संदीप आणि आकाश यांची वैद्यकीय चाचणी, स्पर्धा परीक्षा तयारी आणि मैदान या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी प्रयत्न केलेला अखेर त्यांची सीआरपीएफ पोलिस दलात नियुक्ती झाल्याचा निकाल लागला. दोघे सख्ख्या भावांची केंद्रिय राखीव पोलिस दलात नियुक्ती होणे हे कित्येक ग्रामीण भागातील मुलांसाठी आदर्श आहे.