⁠  ⁠

राजकीय वातावरणात जडणघडण झाली पण वैशाली मेहनतीने बनली पोलिस अधिक्षक

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Success Story : आपण एखादी गोष्ट जिद्दीने करायची ठरवली की आपल्याला यश हे मिळतेच. तसेच वैशालीने खूप मेहनत घेतली आणि प्रशासकीय अधिकारी झाली. वैशाली माने यांची पोलिस अधिक्षकपदी निवड झाली आहे. वैशालीच्या घरी तसं राजकीय वातावरण होते. पण तिने राजकारणात न जाता शैक्षणिक वाटचाल प्रबळ केली. वैशाली माने या जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्राचार्य उत्तमराव माने यांच्या द्वितीय कन्या आहेत. पाटण तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी असून त्यांचे ढेबेवादी खोऱ्यात चांगले राजकीय वलय आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील हत्तीखाना येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण कन्या शाळा सातारा येथे झाले. तसेच पदवीपुर्व शिक्षण सायन्स कॉलेज सातारा येथे झाले त्यानंतर इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमध्ये बीएसएलएलबी ची पदवी संपादन केली. तसेच नुकतीच त्यांनी एलएलएमची मास्टर पदव्युत्तर ही संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

या तयारीच्या जोरावर त्यांची २०१९ मध्ये डीवायएसपी पदी निवड झाली. प्रशिक्षण व प्रोबेशन झाल्यावर त्यांची विविध ठिकाणी बदली झाली आणि त्या प्रामाणिकपणे काम बजावत आहेत. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी लोकांना बरीच मदत केली.

Share This Article