MPSC कडून ऑनलाईन पोर्टलचं अपग्रेडेशन होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती

Published On: ऑक्टोबर 18, 2021
Follow Us
MPSC State Service Prelims Admit Card 2021

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. आयोगानं विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. एमपीएससीकडून उमेदवारांना महत्वाची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळं आणि ऑनलाईन अ‌ॅप्लिकेशन सिस्टीम अपडेट करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन पोर्टलचं अपग्रेडेशन आज सायंकाळी 6 ते 6.30 या काळात होणार आहे. आयोगाकडून ट्विट करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

राज्य सेवा परीक्षेच्या 390 पदांसाठी जाहिरात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

राज्य सेवा परीक्षेचं वेळापत्रक काय?
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

पदांचा तपशील
उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now