एका छोट्या गावातील तरूणीने अभ्यासाच्या जोरावर जागतिक पातळीवर झेप घेण ही प्रेरणादायी बाब आहे.
माणगाव शहरातील विकास कॉलनी येथे राहणारी तृणाली अनिल शाह या तरुणीने करून दाखवले.तृणालीचे वडील अनिल शाह यांना आपल्या मुलीने इतर विद्यार्थ्यार्थ्यांपेक्षा वेगळे करावे म्हणून अवकाश संशोधन हा विषय निवडून तिला मोबाईलवर असंख्य व्हिडिओ आणि निरीक्षणं अभ्यास करण्यासाठी देत असत. त्यामुळेच तिला लहानपणापासूनच अंतराळ संशोधनाची आवड निर्माण झाली होती.
विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण भौतिक शास्त्र या विषयात पूर्ण केले. त्यानंतर अंतराळ हवामान या विषयात स्पेस केंद्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जीओ मॅग्नेटिझम या संशोधन संस्थेत पीएचडी केली आहे. त्यानंतर तिला पोस्ट डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यासाठी वडील अनिल, काका दिनेश, भाऊ राज आणि सर्वच शाह परिवाराने भरपूर प्रोत्साहन दिले.नागोया विद्यापीठात गेस्ट रिसर्चर म्हणून पाच महिने संशोधक म्हणून काम करणार आहे.
त्यानंतर ती अमेरिकेतील नासा या मुख्य संशोधन केंद्रातील कार्यालयात हजर होणार आहे. या प्रशिक्षण काळात तृणाली पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील प्रभावाचा मानवी जीवनावरील होणारे परिणाम यावर संशोधन करणार आहे.लवकरच ती जपान येथे प्रशिक्षणासाठी प्रयाण करणार आहे. अशा प्रकारे नासामध्ये निवड होणारी तृणाली ही रायगड जिल्ह्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी तरुण संशोधक ठरली आहे.