UPSC Civil Services Recruitment 2022 : नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने नागरी सेवा परीक्षा २०२२ ची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या नोटीसनुसार एकूण ८६१ १०११ जागा रिक्त आहेत. युपीएससीच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख आज 22 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
अधिसूचनेनुसार, UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 द्वारे, IAS, IFS आणि IPS सह अनेक अखिल भारतीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांच्या पदांसाठी निवड केली जाईल.
रिक्त पदांचे तपशील
१) नागरी सेवा –
२) भारतीय वन सेवा –
नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ कधी होईल
UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2022 5 जून रोजी घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. त्याच वेळी, मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी.
वय श्रेणी
उमेदवारांचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 32 वर्षे असावे. तथापि, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा फी : १००/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 05 जून 2022
मुख्य परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.upsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जासाठी : इथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरती ; दरमहा 45000 पगार मिळेल
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमार्फत 529 जागांसाठी भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
- इंग्रजी येत नव्हतं म्हणून अनेकांनी चिडवलं; पण जिद्दीने सुरभी गौतम बनल्या IAS ऑफिसर
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत नाशिक येथे भरती
- IDBI बँकेत पदवी पास तरुणांसाठी उत्तम संधी; 650 जागांवर भरती जाहीर
Comments are closed.