---Advertisement---

चहा विक्रेत्याचा मुलगा बनला IAS अधिकारी, वाचा देशल यांचा प्रेरणादायी प्रवास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story आपले वडील शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे, त्याने स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला. कुशाल दान या छोट्याशा चहा विक्रेत्याने स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती की ते एका IAS अधिकाऱ्याचे वडील होतील. आर्थिक अडचणींमुळे कुशल आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढून मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे घेत असतं. आयुष्यभर कुशलला फक्त वेदना आणि संघर्षाचे अश्रू माहित होते.

तथापि, त्यांचा मुलगा देशल दान चरण याने पहिल्याच प्रयत्नात UPSC AIR-८२ रॅंकसह ही परीक्षा उत्तीर्ण करून ‘आनंदाचे अश्रू’ अनुभवले. राजस्थानमधील सुमलाई या छोट्याशा गावातून देशलचे बालपण गेले. दहा जणांच्या कुटुंबात जन्मलेल्या चरणच्या वडिलांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चहा विकला. देशल दान चरण लहानपणापासूनच हुशार आणि लवकर शिकणारा होता. त्याने आपल्या मोठ्या भावाचे मार्गदर्शन घेत शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केली. पुढे त्याने IIT जबलपूरमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नपूर्वक जेईई परीक्षा क्रॅक केली..

आयआयटी जबलपूरमधून उत्तीर्ण झाल्यानंतर, सहजपणे चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकली असती. तथापि, त्याने नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.हे त्याचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांनी दिल्लीला जाऊन तयारी सुरू केली.स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. अखेर, त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने AIR-८२ सह युपीएससीची उत्तीर्ण करून IAS बनला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts