⁠
Inspirational

लहान वयातच दृष्टी कमी झाली; पण अहोरात्र अभ्यास करून आयएएस अधिकारी बनले

UPSC IAS Success Story : आपल्या आयुष्यात असणारा असणारा आणि दृष्टी नसल्याने येणारा अंधार या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्या तरी प्रकाशमय वाट शोधणं ही आपली जबाबदारी आहे. अंकुरजीत सिंग यांनी अंधारातदेखील उजेड शोधला. लहान वयातच त्यांची दृष्टी हळूहळू कमी झाली आणि त्यांना दिसणं बंद झालं. परंतू शिक्षणाची कास काही सोडली नाही.हरियाणातील यमुनानगर येथे जन्मलेले अंकुरजीत सिंग लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते.आईच्या मदतीने शालेय पाठ्यपुस्तके पूर्ण करत असत. केवळ आईचं बोलणं ऐकून त्यांना वर्गातील लेक्चर्स

समजून घेत. पुढे, आय.आय‌.टी साठी अर्ज केला. दृष्टीदोष असूनही त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयटी रुरकी येथे जागा मिळविली. आता त्यांनी ठरवले की स्पर्धा परीक्षेची तयारी करायला हरकत नाही. ते देखील सहज शक्य आहे. म्हणून, त्यांनी तयारी करायला सुरुवात केली.

स्क्रीन रीडर आणि तांत्रिक साहाय्यांचा वापर करून, रात्र-रात्र उशिरापर्यंत जागून त्यांनी परीक्षेचा अभ्यास केला.२०१७ मध्ये अंकुरजीत यांच्या कठोर परिश्रमाला फळ मिळालं, जेव्हा त्यांनी या परीक्षेत ४१४ वा क्रमांक मिळवला. देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांपैकी एक असलेलं आयएएस अधिकाऱ्याचं पद मिळवलं. नुकतीच अंकुरजीत सिंग यांची जालंधर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Back to top button