UPSC IAS Success Story : मजूरांचे आयुष्य हे पूर्णतः स्थलांतरित होत असते. ज्या ठिकाणी पोटाची खळगी भरेल त्याठिकाणी ते संपूर्ण कुटुंब स्थलांतर करतात. तसेच, बिरजूचे कुटुंब पोटापाण्यासाठी आणि कामाच्या शोधासाठी राजस्थानमधील खोटा मधूर शिराळ्यात आले.
दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी बसवण्याचे काम करायचे. बिरजू गोपाल चौधरी हा लहानपणापासून शांत, संयमी आणि आज्ञाधारक होता. शिराळ्याच्या शाळेत आल्यावर त्याला भाषेची अडचण निर्माण झाली. मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले.पहिली ते दहावीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत शिकला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्वप्नांच्या मागे वाटचाल सुरू केली.
मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्माला आला असेल तर… त्यातून त्याने मोठा अधिकारी व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्याचा शाळेतच पाया भक्कम झाल्याने त्याला आयुष्याच्या वाटेवर योग्य दिशा मिळाली. पुढे त्याने अहोरात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला. या जोरावर आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून पद मिळवले. त्यानंतरही परीक्षा देत राहिला आणि यूपीएससी परीक्षेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.२०२३-२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिरजू हे देशात १८७ व्या रॅंकने उत्तीर्ण झाला आणि आय.ए.एस अधिकारी बनला.