⁠  ⁠

वाचा 22 व्या वर्षी IAS बनलेल्या चंद्रज्योती सिंग यांची यशोगाथा..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाणारी यूपीएससी परीक्षा, ही अनेक तरुणांच्या स्वप्नांची प्रतीक आहे. या परीक्षेत यश मिळवणे हे एक गौरवास्पद काम मानले जाते, विशेषत: पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारे विद्यार्थी खूप कमी असतात. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे चंद्रज्योती सिंग (Chandrajyoti Singh) यांची, ज्यांनी वयाच्या केवळ २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. UPSC IAS Success story in Chandrajyoti Singh

चंद्रज्योती सिंग यांचे आईवडील सैन्यात कार्यरत होते. त्यांचे वडील कर्नल दलबरा रिटायर्ड आर्मी आफिसर आहेत, तर आईदेखील आर्मीत कार्यरत होत्या. सैन्यातील कुटुंब असल्याने चंद्रज्योती यांचे शिक्षण वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले. त्यांनी १२वी इयत्तेत ९५.४ टक्के गुण मिळवले होते आणि दिल्ली युनिव्हर्सिटी मधून इतिहास विषयात पदवी प्राप्त केली होती.

ग्रॅज्युएशन नंतर, चंद्रज्योती यांनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी अभ्यासाचा एक सखोल प्लान तयार केला होता. रोज १-२ तास पुस्तक वाचून नोट्स बनवण्याची त्यांची पद्धत त्यांना खूप फायदेशीर ठरली. या मेहनतीच्या बळावर, चंद्रज्योती यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आणि आयएएस अधिकारी बनल्या.

चंद्रज्योती यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहे. त्यांच्या शिक्षणाला आईवडिलांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि त्यांच्या साथ दिली, ज्यामुळे चंद्रज्योती यांना आपले स्वप्न पूर्ण करण्यात मदत झाली.

Share This Article