आपली परिस्थिती हीच आपली ताकद बनते. हेच हिमांशूच्या जीवनप्रवासातून दिसून येते. हिमांशू गुप्ताच्या घरची परिस्थिती ही बेताची होती. गावापासून शाळा देखील दूर होती.त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज ७० किमी प्रवास केला. इतकंच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी चहाच्या दुकानात आणि मजूर म्हणूनही काम केले. एकट्या वडिलांना काही होत नव्हते.
म्हणून, हुमांशू देखील वडिलांना मदत करत असे. एखादी गोष्ट करण्याची मनात जर जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकता.
तसेच, पदवी शिक्षण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर २०२० मध्ये IAS पदी निवड झाली.यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झालेल्या हिमांशू गुप्ता कुटुंबाची मान उंचावली आहे.