⁠
Inspirational

जिद्दीला सलाम ! अनेक सर्जरी होऊनही जिद्दीने अभ्यास करून बनली IAS अधिकारी

UPSC Success Story : जे विद्यार्थी सर्व संकटांना तोंड देऊनही यशस्वी होतात. त्यांचा प्रवास हा अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे प्रीती बेनीवाल. एका रेल्वे अपघाताला बळी तिला दुखापत झाली. तिला जवळपास १४ सर्जरी कराव्या लागल्या आणि एक वर्षाहून अधिक काळ त्याला अंथरुणाला खिळून राहावे लागले. यात ठरलेले लग्न पण मोडले. एवढे असूनही तिने सकारात्मक पद्धतीने परिस्थिती सोबत सामना केला‌. हरियाणातील दुपेडी येथील रहिवासी असलेल्या प्रीतीने जवळच्या फफडाना गावात एका खासगी शाळेत शिक्षण घेतलं. तिने दहावीत चांगले गुण मिळवून यश संपादन केलं.

तिचे वडील पानिपत थर्मल प्लांटमध्ये काम करत होते तर आई बबिता जवळच्या अंगणवाडीत काम करत होती. त्यानंतर तिने बारावीचे शिक्षण हे मतलौदा येथे घेतले आणि इसराना कॉलेजमधून बी.टेक आणि एम.टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.प्रीतीने 2013 ते 2016 या कालावधीत बहादूरगड येथील ग्रामीण बँकेत क्लार्क म्हणून काम केलं. 2016 ते जानेवारी 2021 पर्यंत कर्नालमध्ये FCI चे असिस्टेंट जनरल II म्हणून काम केलं. त्यानंतर, जानेवारी 2021 मध्ये परराष्ट्र मंत्रालयात असिस्टेंट सेक्शन ऑफिसर म्हणून तिची निवड झाली.

त्यानंतर ती दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करू लागली. याच दरम्यान तिचा रेल्वे अपघात झाला. त्यानंतर तिला डॉक्टरांनी सक्तीचा आराम करायला सांगितले. पण तिने यांचा अभ्यासासाठी फायदा करून घेतला‌. आयएएस अधिकारी होण्याचं प्रीतीचं बालपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती समर्पित होती म्हणून तिने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने अहोरात्र मेहनत घेतली आणि ती आय.ए.एस अधिकारी झाली.

Related Articles

Back to top button