आपल्या उराशी जिद्द असेल तर यश हे मिळतेच. हेच जयंत यांनी दाखवून दिले आहे. बीड येथील रहिवासी असलेल्या जयंत मंकळे यांनी संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही वर्षे एका खासगी कंपनीत मेंटेनन्स इंजिनीअर म्हणून काम केले.पण यात मन रमत नसल्याने त्याने युपीएससीची तयारी करायला सुरुवात केली.
त्याचा हा प्रवास तसा सोप्पा नव्हता. त्यास रेटिनायटिस पिगमेंटोसा या दुर्मिळ अनुवांशिक विकारामुळे त्याची यांची ७५% टक्के दृष्टी गेली. इतकेच नाहीतर तर अवघ्या वयाच्या १० वर्षे वडील देखील वारले. त्यामुळे परिस्थिती अधिकच बेताची झाली. आता उदरनिर्वाह कसा करावा? हा त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला. त्यामुळे, त्यांच्या आई आणि दोन मोठ्या बहिणीने पुण्यात लोणची विकून त्यांच्या शिक्षणाचा खर्च करत आहेत. त्याच्या अभ्यासाला मदत करण्यासाठी त्याने शैक्षणिक कर्ज देखील घेतले आणि आपले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहिले. हे अंधत्व त्यास जन्मतः नव्हते.
अशा प्रतिकूल आर्थिक संकटाशी सामना करत जयंत मंकाळे यांनी मराठी माध्यमात यूपीएससीची तयारी केली. त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऑडिओबुक आणि स्क्रीन रीडर परवडत नव्हते. ऑल इंडिया रेडिओवर बातम्या आणि व्याख्याने ऐकली. लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीवरील वादविवाद कार्यक्रम हा त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरला. याशिवाय मराठीतील नामवंत लेखकांची भाषणे मी युट्यूबवर ऐकली.
विविध प्रकारच्या नोट्स ऐकून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि जयंतने २०१८ मध्ये युपीएससीची परीक्षा AIR रँक ९२४ सह उत्तीर्ण केली. जयंत आय.ए.एस होण्याच्या त्याच्या स्वप्नावर ठाम होता, आणि त्याने आणखी एक प्रयत्न केला. AIR १४३ सह उत्तीर्ण झाला आणि शेवटी IAS झाला.