⁠
Inspirational

वडिलांचे आयएएसचे स्वप्न भंगले; पण मुलगी आयपीएसनंतर बनली आयएएस अधिकारी..

UPSC IAS Success Story प्रत्येकजण लहानपणापासून निराळे स्वप्न उराशी बाळगून प्रवास करत असतं. मुद्रा गायरोलाच्या वडिलांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पण ते पूर्ण करू शकले नव्हते. त्यामुळे आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत केली. मुद्रा यांनी आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे

IAS अधिकारी असलेल्या मुद्रा गायरोला या उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या रहिवाशी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात अव्वल होत्या. त्यांना दहावीच्या परीक्षेत ९६% आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९७% गुण मिळवले होते. त्यामुळे भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते देखील त्यांचा सन्मान झाला होता. त्याचवेळी त्यांनी ठरवले की आपण देखील मोठे होऊन आय.ए.एस अधिकारी व्हायचे.

बारावीनंतर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्समध्ये प्रवेश घेतला. बीडीएसमध्ये ही त्यांनी सुवर्णपदक मिळवले. पण त्यांनी वैद्यकीय पेशा स्वीकारला नाही. ग्रॅज्युएशननंतर त्या दिल्लीला गेल्या. आयएएस अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.

यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१८ मध्ये पहिल्यांदा सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली. मुलाखती पर्यंत पोहोचल्या पंरतू निवड होऊ शकली नाही. मुद्रा गायरोला यांनी पुन्हा एकदा २०१९ मध्ये युपीएससीची दिली. पण तेव्हा देखील नाव अंतिम गुणवत्ता यादीत आले नाही. यानंतर मुद्राने २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

त्यांना १६५वा क्रमांक मिळवला. पण त्यावेळी IPS अधिकारी हे पद मिळाले. पण त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. पुन्हा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा दिली आणि यावेळी ५३व्या रँकसह यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनल्या.

Related Articles

Back to top button