UPSC Success Story : लहानपणापासून निमिषला अधिकारी व्हायचे होते.शालेय जीवनाच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न बाळगले होते. त्यानुसार त्याने जिद्द ठेवली…अभ्यासातील गोडी कायम ठेवली.केआरपी कॉलेजचे प्रा. दशरथ पाटील यांचा निमिष हा लेक.निमिषचे प्राथमिक शिक्षण डॉ. व्ही एस नेर्लेकर विद्यालयात, माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर येथे झाले आहे.
इयत्ता चौथी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेतही निमिषचे गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली होती. त्यांनतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी थेट दिल्ली गाठली होती.
पण त्याला यश आले नाही. अपयश आल्याने नाराज झाला तेव्हा आई – वडिलांनी पाठिंबा दिला.यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निश्चय केला होता. पहिल्या दोन मुख्य परीक्षेत पास झाला. पण मुलाखतीच्या वेळी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. आई वडीलांच्या पाठींब्याने तिसऱ्यांदा केलेला प्रयत्न यशस्वी झाला.जिद्द, चिकाटी,अभ्यासात सातत्य ठेवल्याने हे यश पदरी पडले आहे.
निमिष दशरथ पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परीक्षेत देशात ३८९ क्रमांक पटकावला. गुणवत्ता यादीनुसार निवड झालेल्या उमेदवारांतून तो आयएएस होणार आहे.