⁠  ⁠

हिंदी माध्यमातून शिक्षण झाले; पण मेहनतीने IAS अधिकारी बनले..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story : कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केल्यावर भाषा ही खूप अडचण असते. भाषाचा पाया मजबूत नाही, एखादी भाषा बोलता येत नाही म्हणून अनेकजण स्पर्धा परीक्षेची तयारी आणि नोकरीची वाट धरत नाही.

राजस्थान मधील एका छोट्या गावातील मुलाने स्वप्न बघितले आणि ते आता सत्यात उतरले आहे. विकास मीना यांचा जन्म राजस्थानमधील एका गावात झाला असून, त्यांचे सुरुवातीचे शिक्षण राजस्थानमध्ये झाले.दहावी व बारावीच्या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळाले होते. हे हिंदी माध्यमातून शिक्षण घेऊन IAS अधिकारी झाले आहे.

आपल्या मातृभाषेतही परीक्षा देता येते आणि यशाची पायरी गाठता येते हे विकास याने दाखवून दिले आहे.विकास यांचे शिक्षण हिंदी माध्यमात झाले; पण भाषा हा यश मिळविण्यात अडसर ठरू शकत नाही हे त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली.आपल्या भीतीवर मात करीत त्यांनी ही परीक्षा हिंदी माध्यमातूनच देण्याचा निर्णय घेतला.हिंदी माध्यमाला आपली ताकद बनवून पहिल्याच प्रयत्नात IPS अधिकारी झाले. पण, त्यांना IAS बनायचे होते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि २०१७ मध्ये त्यांची IAS म्हणून निवड झाली.

Share This Article