⁠  ⁠

शेतकऱ्याचा लेक झाला आयपीएस अधिकारी; अनेकांसाठी दिशादर्शक प्रवास !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

लहानपणापासून अभ्यासाची आवड आणि लोकसेवा करण्याची शिकवण…. त्यामुळे त्याने लहानपणीच ठरवले होते की आपण डॉक्टर व्हायचे. पण लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न होते, आता तो आयपीएस झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख. त्याचे शालेय शिक्षण हे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले.

अकरावी व बारावी येथील के.बी.पी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पुणे येथील कॉलेज आफ इंजिनिअरींगमधून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअरिंग केल्यावर खाजगी नोकरीकडे न वळता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला.पुणे येथे राहून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. तीन वर्षापासून ते प्रयत्न करत होतो. गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले होते. त्यांची इंडियन कॉर्पोरेटमध्ये निवड देखील झाली होती.‌ त्यांनी पुन्हा अभ्यास केला आणि आयपीएस पदासाठी प्रयत्न केला.

यात ते यशस्वी ठरले आणि त्यांची आयपीएस पदासाठी निवड झाली.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. लोकांची सेवा करण्याबरोबरच पिडितांना न्याय देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहेत.

Share This Article