UPSC IPS Success Story : खरंतर युपीएससी सारख्या परिक्षेत खूप कमी जणांना आय.पी.एस हे पद पहिल्याच प्रयत्नात मिळते. यामागे भरपूर अभ्यास व चिकाटी लागते.पण काजल ही ४८५ वा रँक मिळवून आयपीएस अधिकारी बनली. तिने या प्रवासात टीना दाबी यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि तिने हे स्थान मिळवले आहे.
काजल मूळची उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील माणिकपूरजवळील राणीपूरची आहे. आयएएस अधिकारी आणि यूपीएससी टॉपर टीना दाबीच्या यशाने तिला प्रेरणा दिली. ती यूपीएससीच्या तयारीसाठी सोशल मीडियापासून दूर गेली आणि दररोज आठ ते दहा तास सेल्फ स्टडी करायची. ती दिल्लीत राहून ही तयारी करत होती . तिचे शालेय शिक्षण सेंट मायकल शाळेत पूर्ण केले. तिला दहावी मध्ये ९५% आणि बारावीमध्ये ९१% गुण मिळवले.
त्यानंतर तिने बीएमध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. तिने कला शाखेत ८१% गुण मिळवून पदवी पूर्ण केली. यानंतर ती कोचिंगसाठी दिल्लीला गेली आणि इग्नूमधून एमएही पूर्ण केले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. यात तिने सातत्याने अभ्यास आणि वाचन केले. तिच्या अतुलनीय चिकाटीने आणि मुख्य म्हणजे समर्पणाने तिला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले.