आपल्या यशाच्या प्रवासात कुटुंबाची साथ ही महत्त्वाची असते. गुगल सारख्या कंपनीतील नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे ठरवल्यावर अनुदीपला कुटुंबाची मोठी साथ लाभली. त्यांनी त्याला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. अनुदीपने बीट्स पिलानीतून पदवी पूर्ण केल्यानंतर गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. पण यात त्याला समाधान मिळत नव्हते.
त्यामुळे त्याने स्पर्धा परीक्षा करण्याचे ठरवले. त्यांनी २०१२ मध्ये पहिली आणि २०१३ मध्ये दुसरी यूपीएससीची परीक्षा दिली. पण त्यांना यश मिळाले नाही. तू करू शकतोस आणि जमू शकते…हा कुटुंबाचा आधार महत्त्वाचा होता. त्यानंतर त्याने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याची निवड आयकर सेवेत झाली. पण त्यांच्या मनात आयएएस बनण्याचे स्वप्न होते.त्यांनी हार न मानता पुन्हा २०१४ आणि २०१५ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली.
शेवटी २०१७ मध्ये त्यांनी पाचव्या प्रयत्नात यश मिळवले.अनुदीपने २०१७ मध्ये यूपीएससीची परीक्षा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्याने या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवण्याचाही विक्रम केला. त्यांनी एकूण २०२५ पैकी ११२६ गुण मिळवले.आयएएस अनुदीपची ही प्रेरणादायी कहाणी नक्कीच तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.