आयपीएस तनुश्री (IPS Tanushree) यांनी लग्न झाल्यावर घर आणि नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. तनुश्री यांचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी झाली. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण बिहारच्या मोतिहारी शाळेतून केले.
त्यानंतर त्यांना १२वीपर्यंतचे शिक्षण केले. बारावीत त्यांना चांगले गुण मिळाले त्यानंतर त्यांचे अॅडमिशन मिरांडा हाउस कॉलेजमध्ये केले. त्यांनी हिस्ट्री ऑनर्समध्ये बीए केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या.
तनुश्री यांची मोठी बहीणदेखील सीआरपीएफ कमांडंट आहेत. त्यांनादेखील वर्दी घालायची होती. त्यांचे वडील सीआरपीएफमधून डीआयजी निवृत्त होते. त्यामुळे त्यांना सीआरपीएफ ऑफिसर व्हायचे होते आणि त्यांनी ती परीक्षा क्रॅकदेखील केली.
आयपीएस होण्याआधी त्यांनी याआधी सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्समध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नोकरी सुरु केली. यानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला अन् त्या स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरल्या. तनुश्री यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचीदेखील परीक्षा पास केली. परंतु त्यांनी तिथे जॉइन केले नाही.
यानंतर २०१५ मध्ये तनुश्री यांनी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सर्व सुरळीत चालू असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तनुश्री यांनी घर आणि नोकरी सांभाळून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी २०१७ मध्ये परीक्षा क्रॅक केली अन् आज आयपीएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देईल.