---Advertisement---

मित्रांकडून उधार पैसे घेऊन पुस्तके विकत घेतली, पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर केली..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

इलाहाबादचे कुलदीप द्विवेदी (Kuldeep dwivedi) हे एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आर्थिक अडचणींच्या मध्येही आपल्या मेहनती व जिद्दीच्या बळावर UPSC परीक्षा क्रॅक केली. कुलदीप यांचे वडील गार्ड म्हणून नोकरी करायचे, पण त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण होण्यासाठी ते पैसे पुरेसे नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील नोकरीसोबतच शेती देखील करायचे.

कुलदीप द्विवेदी यांनी इलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. २००९ साली त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले, तर २०११ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परंतु आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की त्यांच्याकडे पुस्तके घेण्यासाठीही पैसे नव्हते. मित्रांकडून उधार पैसे घेऊन त्यांनी पुस्तके विकत घेतली.

कुलदीप द्विवेदी यांनी कोणत्याही मोबाईल किंवा लॅपटॉपशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी २०१५ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्लिअर केली आणि २४२ रँक मिळवली. कुलदीप यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts