आजच्या काळात प्रत्येकासाठी अत्यंत प्रिय आणि महत्त्वाची वस्तू म्हंटली की ते म्हणजे मोबाईल. यामध्ये फक्त तरुणच नव्हे तर वयोवृद्ध देखील या मोबाईलचे चाहते झाले आहेत. मोबाईल शिवायचं हे कठीणच असे प्रत्येकाला वाटायला लागली आहे. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी असलेली इच्छाशक्ती जिद्द या आयुष्यात यशाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणी बाजूला सारून त्यातून मार्ग काढून यशाची ध्येय गाठतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नेहा ब्याडवाल.
सगळ्यात अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षा पैकी एक असलेली यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मोबाईल हा नेहा यांना अडथळा निर्माण करणारा वाटत होता. त्यासाठी नेहा यांनी मनाशी एक निर्णय घेऊन, यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करून आयएएस होईल तोवर हातात मोबाईल घेणार नाही असा निश्चय केला.
नेहा ब्याडवाल या मूळ जयपूर येथील रहिवाशी आहेत परंतु त्यांचे बालपण छत्तीसगडमध्ये गेले. वडील हे सरकारी नोकरी करत असल्याकारणाने त्यांच्या वडिलांचे अनेक ठिकाणी ट्रान्सफर होत असतात त्यामुळे नेहा यांना देखील अनेक शाळा बदलाव्या लागल्या परंतु त्या शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार होत्या. नेहा यांनी जयपूर येथील डीबी गर्ल्स कॉलेजमध्ये अँडमिशन घेतले. शिकत असताना त्या युनिव्हर्सिटीच्या टॉपर देखील होत्या. घरात वडिलांना सरकारी नोकरी करताना पाहून त्यांनी वडिलांकडून आयएएस ऑफिसर होण्याची प्रेरणा घेतली व त्यासाठी तयारीला सुरुवात केली.
प्रथम प्रयत्नात नेहा ब्याडवाल यांना अपयश पत्करावे लागले.त्यांनतर नेहा यांनी सोशल मीडिया पासून लांब राहण्याचा निर्णय घेतला व त्यासाठीच त्यांनी जवळपास तीन वर्ष फोनला हात देखील लावला नाही. व सातत्याने मेहनत,जिद्द ,आणि प्रामाणिकपणे अभ्यास करत त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली.
अखेर दुसऱ्या प्रयत्नात नेहा यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले व त्यांचे स्वप्न पूर्ण होऊन त्या आज आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.