⁠  ⁠

नोकरी करत केला परीक्षेचा अभ्यास आणि परमिताने मिळवले युपीएससी परीक्षेत यश !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आपली अभ्यासातील आवड आणि सातत्य हे अनेक गोष्टींसाठी बळ देते. परमिता मालाकार यांनी २०१२ मध्ये बीएससी (ऑनर्स) फिजिक्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी बीपीओमध्ये नोकरी केली. त्यानंतर परमिता यांनी कॉर्पोरेट नोकरी करण्याचा निर्णय घेतला. परमिता यांनी सुरुवातीला टिसीएस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली.

यात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी टिसीएस कंपनीत नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १२ तासांच्या नोकरीसोबत अभ्यास केला. त्यांना पहिल्या प्रयत्नान अपयश आले. पण पुन्हा तेवढ्याच ताकदीने अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. त्यांनी कोलत्ताच्या एका कोचिंग सेंटरमध्ये क्लासेस लावले.

त्यांनी प्रत्येक आठवड्याला मॉक टेस्ट दिले.त्यांनी ३० व्या वर्षी एलआयसी, बँक पीओ, रेल्वे, पश्चिम बंगाल लोक सेवा आयोग अशा अनेक परीक्षा देण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये परमिता यांनी यूपीएससीची प्रिलियम आणि मुख्य परीक्षा दिली. त्यात त्या पास झाल्या. २०२३ साली त्यांचे सिलेक्शन झाले.परमिता यांनी १२ तासांची नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयार केली. सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

Share This Article