⁠
Inspirational

नोकरी सांभाळून केला अभ्यास आणि सृष्टी झाली IAS अधिकारी!

UPSC Success Story : काही लोक जीवनात अनेक गोष्टींमध्ये बाजी मारतात आणि त्या सर्वांमध्ये यशस्वी होतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे दिल्लीतील सृष्टी डबासची आहे.जिने युपीएससीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवले आहे.तिने यात सहावा क्रमांक पटकावला. मोठ्या मेहनतीनं ती आय.ए.एस अधिकारी झाली आहे.

सृष्टी डबास ही मूळ दिल्लीची रहिवासी.तिचे शालेय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण हे दिल्लीतून झाले. पुढे करियर घडविण्यासाठी ती मुंबईत आली. सृष्टीला अभ्यासाची प्रचंड आवड. ती अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिने पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू‌ केला. यामुळेच,तिने सामाजिक न्याय आणि अधिकारिता या विभागात मंत्रालयात काम केले. यानंतर मुंबईत पोस्ट केलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये काम करत होती.

आरबीआयमध्ये काम करत असतानाच तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. ती दिवसा काम करायची आणि रात्री अभ्यास करायची.त्याबरोबरच ती एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होती. सोबतच यूपीएससीचा अभ्यासही सुरू होता. एवढं सगळं सांभाळून देखील तिने यूपीएससी परीक्षेत सृष्टीने सहावा क्रमांक पटकावलाय. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास अशा अथक प्रयत्नांनीच तिनं हे यश मिळवलंय.

Related Articles

Back to top button