अभिमानाची गोष्ट! कर्णबधिर असूनही अवघ्या २२ व्या वर्षी सौम्याचे युपीएससीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश !
UPSC Success Story : खरंतर आपल्याकडे ज्या क्षमता आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि क्षितीज रूंदावण्यासाठी धडपडले पाहिजे.सौम्या शर्मा ही कर्णबधिर असूनही त्यांनी कोणत्याही सवलतीवर विसंबून न राहता सर्वसाधारण प्रवर्गात अर्ज केला. अभ्यासाच्या जोरावर सौम्या शर्माने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या बावीसाव्या वर्षी यूपीएससी परीक्षेत देशभरात नववा क्रमांक मिळवत नेत्रदीपक स्थान पटकावले.
सौम्या शर्मा (Soumya Sharma) ह्या दिल्लीच्या रहिवासी आहे. लहानपणापासून सौम्या कर्णबधिर मूळीच नव्हत्या. सोळाव्या वर्षाच्या असतानाच अचानक कमी ऐकायला लागले. तेव्हा, त्यांनी ९० ते ९५ टक्के आपली ऐकण्याची क्षमता गमावलेली होती. याचे कारण डॉक्टरांकडून सुद्धा समजू शकलं नाही. सौम्या अभ्यासू आणि धाडसी मुलगी. परिस्थितीमुळे हताश न होता तिने दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनएलयूमध्ये काम करून अनुभव घेतला.त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. ह्या परीक्षेची तयारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट सीरीजचा आधार घेतला. यानंतर त्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने हे स्वयंअध्ययन फार फायदेशीर ठरले.
यात तिची पूर्व परीक्षा क्लिअर झाली पण मुख्य परीक्षेच्या आठवडाभर आधी सौम्याला प्रचंड ताप आला. मात्र आजारपण असूनही १०२-१०३ डिग्री ताप असताना सुद्धा त्या परीक्षेला बसल्या होत्या. याच पहिल्या प्रयत्नात त्या युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. प्रश्न पटकन समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता तसेच सामान्य ज्ञानातील त्यांचा भक्कम पाया यामुळे त्यांना यश मिळाले आहे. त्यानंतर, त्यांना आय.ए.एस – क्लास वन हे पद मिळाले.नागपूर जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ म्हणून सौम्या शर्मा यांची नेमणूक झाली आहे.सौम्या यांचे पती अर्चित चांडक हे २०१८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सौम्या यांनी मुलींच्या वसतिगृहासाठी, दिव्यांग व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी बहुमोल कार्य केले आहे.
मित्रांनो, खूप कमी लोक या परीक्षेत एकाच वेळी यशस्वी होतात. पण मनात दृढ निश्चय असेल तर कोणतेही काम अवघड नसते.