⁠  ⁠

विविध सरकारी विभागांमध्ये मेगाभरती ! ; ‘या’ विभागांत होणार भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय क्षेत्रात झालेली मेगाभरती आता रोजगार क्षेत्रातही होणार आहे. विविध सरकारी विभागांमध्ये दहावी उत्तीर्ण ते उच्चशिक्षितांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, पोस्ट, कृषी, मत्स्य विभाग, बँकिंग क्षेत्रांचा समावेश आहे. त्याजोडीला रिझर्व्ह बँक, प्राप्तिकर विभाग, कस्टम्स, सीबीआय आदी विभागांमध्येही क्लर्क पदे खुली होण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, लातूर विभागात कृषीसेवक पदांची संधी आहे. नागपूर (२४९ पदे), अमरावती (२३९), लातूर (१६९), औरंगाबाद (११२) येथे ही पदे असतील. महाराष्ट्र डाक विभागात पोस्टमनला सहाय्यक असलेल्या ३,६५० ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण आणि कम्प्युटरचे ज्ञान ही अट आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयासह राज्यातील इतर विभागीय कार्यालयांमध्ये सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचीही भरती आहे. त्यासाठी रितसर अर्ज मागवून परीक्षा, मुलाखतीद्वारे भरती होईल. म्हाडामध्ये मंजूर पदे व कर्मचारी संख्येत तफावत असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याने भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या विभागांतही पुढील वर्षी भरती होणार आहे. त्यात रिझर्व्ह बँकेसह अन्य विभागांचा समावेश आहे. क्लार्क स्तरावरील ही पदे भरली जाणार असल्याचे सांगण्यात येते. राज्याचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ इंजिनीअर स्तरावर ४०५ पदे आहेत. मत्स्य विभागात सहाय्यक मत्स्यविभाग विकास अधिकारी (३७ पदे), मृद व जलसंधारण विभागात औरंगबादसाठीही (१८२) भरती होईल.

येथे होणार भरती…
कृषिसेवक
ग्रामीण डाकसेवक
म्हाडा
सार्वजनिक बांधकाम
मत्स्य विभाग

Share This Article