---Advertisement---

महाराष्ट्रात 1 लाख रिक्त पदांवर महाभरती होणार..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रिक्तपदांची संख्या मोठी असताना विकासकामे मार्गी लागणे अशक्य आहे, असे सांगत भरतीबद्दलचे कागद त्वरेने तयार करावेत, असे आदेशही शिंदे यांनी दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.

महाराष्ट्रात एकूण दोन लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत. या पदांची आरक्षणनिहाय भरती कशी होईल, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. महाराष्ट्रात अ वर्गात ५० हजार, ब वर्गात ७५ हजार, क वर्गात १ लाख आणि ड वर्गात ५० हजार पदे रिक्त आहेत. रिक्त जागा आणि मंजूर जागांचा आढावा घेऊन आरक्षण आणि बिंदूनामावलीनुसार ही भरती करण्यात येणार आहे.

---Advertisement---

आरक्षणाचे निकष लावून यासंबंधातील जाहिराती तयार करून त्या मंत्रिमंडळासमोर ठेवल्या जाणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. महाविकास आघाडी सरकारनेही यासंदर्भात तयारी चालवली होती. आता ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दर महिन्याला एक लाख कर्मचाऱ्यांना भरती केले जाईल.

विभागाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या :

गृह विभाग 15,000
सार्वजनिक आरोग्य विभाग 24,000
जलसंपदा विभाग 14,000
महसुल विभाग 14,000
वैद्यकीय शिक्षण 12,000
सार्वजनिक बांधकाम 8,000
उर्वरित अन्य विभागांतील रिक्त पदे 12,500
वरील पैकी सार्वजनिक आरोग्य विभागातील 24,000 रिक्त जागांपैकी 8,000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे .यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची मोठी संधाी उपलब्ध होणार आहे .

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now