Tuesday, January 19, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र आंदोलन

Rajat Bhole by Rajat Bhole
April 30, 2020
in History, Study Material
0
महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

1 May 1960 Maharashtra Dinvishesh – Sayukta Maharashtra Movement

भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त चळवळ इ स. १९४६ पासून सुरु झाली. दि. 1 May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
  • 1 May 1960 Maharashtra Dinvishesh – Sayukta Maharashtra Movement
  • महाराष्ट्र राज्याची रचना:
  • संयुक्त महाराष्ट्र : ऐतिहासिक पार्श्वभूमी
  • एकीकरणामागील तात्विक भूमिका
  • संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना – ६ फेब्रुवारी १९५६
  • मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची कामगिरी
  • द्विभाषिक राज्याचा प्रयोग (१९५६ ते १९६०)
  • १९५७ ची सार्वत्रिक निवडणूक
  • शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण प्रतापगडाचा मोर्चा
  • १९६० महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली
  • पुनर्रचना कायद्यातील तरतुदी

महाराष्ट्र राज्याची रचना:

1 May 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी चार प्रशासकीय भाग व २६ जिल्हे महाराष्ट्रात होते.

Advertisements
  1. कोकण विभाग – बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रायगड, रत्नागिरी
  2. पुणे विभाग – पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
  3. नागपूर विभाग – नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला
  4. औरंगाबाद विभाग – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद

महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. 1 May 1960 रोजी कामगार दिनी ‘महाराष्ट्र राज्या’ची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली.

संयुक्त महाराष्ट्र : ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या त्रणानुबंधामध्ये लिहितात. ‘मराठी भाषकांच्या एकीकरणाची साहित्य संमेलनातून निर्माण झाली.
  • १९०८ च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैध यांनी या एकीकरणाचा उल्लेख केला होता. त्या संदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली केसरीमध्ये न. ची. केळकरांनी लिहिले की, ‘ मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी.’ लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावर प्रांतरचनेची मागणी केली होती. आपल्या दै. केसरीतून त्याचे महत्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितली.
  • रामराव देशमुख हे मध्य प्रांत व वऱ्हाड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. त्यांनी १ ऑक्टोबर १९३८ साली ठराव मांडला वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा.
  • १९४१ साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे ‘ संयुक्त महाराष्ट्र सभा’ ही संघटना स्थापना झाली.
  • पुढील वर्षी डॉ.टी.जे. केदार यांच्या नेतुत्वाखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरवण्यात आली.
  • तत्पूर्वी १९४० च्या प्रारंभी श्री. वाकरणकर यांनी धनंजयराव गाडगीळ व न. वि. पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला होता.
  • तर महाविदर्भ व्हावा असे लोकनायक बापूजी अणे यांना वाटत होते.

एकीकरणामागील तात्विक भूमिका

  • भाषावार प्रांतरचनेबाबत आग्रही असणारे लोक याबाबतचे फायदे सांगताना म्हणतात की, घटक राज्याचे सरकार व नागरिक यांची एक भाषा असल्यामुळे राज्यात निकोप लोकशाही निर्माण होईल. जनतेचे विचार-भावना सरकार पर्यंत पोहचतील, कायदेमंडळाचे कार्य जनतेस समजले, भाषावार प्रांतरचेमुळे भाषिक ऐक्य निर्माण होईल, लोक आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतील आणि प्रांतीच भाषा व संस्कृती यांचे संवर्धन होईल.
  • भाषावार प्रांतरचनेस विरोध करणारे यानाबाबतचे तोटे सांगतात की, भाषावर प्रांतरचनेमुळे राज्याराज्यांत फुटीरता वाढीस लागेल. भाषावार प्रांतरचना राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरेल.
1 May 1960 Maharashtra Divas

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना – ६ फेब्रुवारी १९५६

  • ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा घेतली.
  • सर्वांनी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली.
  • परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही असा अर्थ काढून शंकरराव देव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
  • तेव्हा शंकरराव देव यांनी १० फेब्रुवारी रोजी अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र एकीकरण परिषद बरखास्त केली.
  • शंकराव देव समितीत सामील झाले नाहीत आणि आंदोलनापासूनही दुरावले. त्यांचे प्रयत्न, हालचाली काँग्रेसच्या धोरणाशी निगडित राहिल्या.
  • संयुक्त महाराष्ट्र समितीने संयुक्त महाराष्ट्र परिदेचे उद्देश स्वीकारले.
  • समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली.
  • त्यानुसार अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉ. तरयं. रा. नरवणे, जनरल सेक्रेटरी एस. एम. जोशी यांची निवड झाली.

मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची कामगिरी

  • आंदोलनासाठी वृत्तपत्रांची आवश्यकता ओळखून आचार्य अत्रे यांनी ‘दे. मराठा’ पत्र सुरू केले. ‘प्रबोधन’, ‘नवाकाळ’, ‘सकाळ’, ‘नवयुग’, ‘प्रभात’ अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले.
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी (त्याला छक्कड म्हणतात) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत ठरले. ती छक्कड म्हणजे ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ अशी होती. या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. ही लावणी मुंबईच्या लालबावटा कलापथकातील शाहीर अमर शेख यांनी गायली होती.
महाराष्ट्राच्या समाजसुधारकांविषयी – माहिती

द्विभाषिक राज्याचा प्रयोग (१९५६ ते १९६०)

  • मराठी भाषिकांची मागणी मान्य न करता ७ ऑगस्ट १९५६ रोजी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा पास केला.
  • मराठी गुजराती भाषिक लोकांना एकत्र केलेल्या या राज्याचा पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईसह १० जिल्हे, विदर्भाचे मराठवाड्याचे ५, गुजरात सौराष्ट्राचे १६ जिल्हे समाविष्ट केले. यावरून हे राज्य किती विशाल होते ते लक्षात येते.
  • मोरारींनी या राज्याचे स्वागत करून म्हणाले की, ‘बिनविरोध निवड होणार असेल तर आपण मुख्यमंत्री होऊ इच्छित.
  • भाऊसाहेब हिरे यांनी आपली उमेदवारी घोषित केली. मोरारजीनी त्यांना विरोध केला.
  • महाराष्ट्र काँग्रेसने यशवंतरावांची उमेदवारी निश्चित केली.
  • झालेल्या निवडणुकीत यशवंतरावांनी विजय मिळवला.
  • यशवंतराव यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले त्याबद्दल तर्कतीर्थ शा्त्री जोशी लिहितात, की “यशवंतराव म्हणाले, की बंदुकी गोळी न वापरता राज्य करणार आहे. अनेक असामान्य गुण असल्याने यशवंतरावांनी ही जबाबदारी सहज पेलली.”
  • द्विभाषिकांचा निर्णय मराठीप्रमाणे गुजराती लोकांनाही मान्य नव्हता.

१९५७ ची सार्वत्रिक निवडणूक

मुंबई महानगरपालिकेत ७१ जागा समितीने जिंकल्या व श्री. एम. व्ही. दोंदे महापौर झाले.

Advertisements

शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण प्रतापगडाचा मोर्चा

प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या हस्त ३० नोव्हेंबर १९५७ रोजी झाले. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समिती नेहरुसमोर निदर्शने करण्याचे ठरवले. त्यावेळी पूर्ण नियोजन करून भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढला. पसरणी घाट व पोलादपूरजवळ तीव्र निदर्शने केली. नेहरुंना मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव करून देण्यात समिती यशस्वी झाली.

१९६० महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली

  • स्वत: यशवंतरावांनी आपल्या ‘ऋणानुबंध’ या पुस्तकातील ‘संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्वक्षण’ या लेखामध्ये आपल्या हालचालींची व प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली आहे.
  • समितीच्या आग्रहामुळे ‘मुंबई’ राज्य ऐवजी ‘महाराष्ट्र’ असे नाव मान्य झाले.
  • एप्रिल १९६० मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली.

पुनर्रचना कायद्यातील तरतुदी

केंद्र सरकारने एप्रिल १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पास केला तो पुढीलप्रमाणे –
१) द्वैभाषिक मुंबई राज्याचे 1 May 1960 पासून महाराष्ट्र व गुजरात असे दोन भाग करण्यात आले आहेत.
२) मुंबई राज्यातील खाली नमूद केलेला प्रदेश गुजरात या नव्या राज्यात समाविष्ट केला जाईल.

Advertisements

अ) बनातवाडा, मेहसाणा, साबरकाठा, अहमदाबाद, कैरा, पंचमहाल, बडोदा, भडोच, सुरत, डांग, अमरेली, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जुनागढ, भावनगर व कच्छ जिल्हे.
ब) ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील खेडी, पश्चिम खानदेशातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील खेडी तसेच पश्चिम खानदेश जिल्ह्यातील अक्कलकुवा व तळोदे तालुक्यातील खेडी हा प्रदेश पूर्वीच्या मुंबई राज्याचा भाग असणार नाही. मुंबई राज्याचा उरलेला भाग हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल.

Advertisements

Tags: 1 May 1960historyMaharashtra Din
SendShare139Share
ADVERTISEMENT
Next Post
PSI STI ASO 2020 - History

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा इतिहासाची तयारी

MPSC  – पंचायत राज स्ट्रॅटजी

MPSC - पंचायत राज स्ट्रॅटजी

कोरोनाच्या काळात MPSC चा अभ्यास कसा करावा?

कोरोनाच्या काळात MPSC चा अभ्यास कसा करावा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Mission MPSC offers you complete guidance for the preparation of Maharashtra Public Service Commission (MPSC) Rajyaseva, PSI, STI, Exams.

Follow us on social media:

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group