जिल्हा परिषद अहमदनगर येथे विविध पदांच्या ५५५ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) औषध निर्माता/ Pharmacist १३
शैक्षणिक पात्रता : औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
२) आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) १८७
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
३) आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ३५२
शैक्षणिक पात्रता : ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..
४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०३
शैक्षणिक पात्रता : ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)
वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२१ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.nagarzp.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
या गोष्टी लक्ष्यात ठेवा?
१) मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे.
२) या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.
३) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. उमेदवारांनी दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
४) पर्याय निवडताना काही अडचण आल्यास उमेदवारांना ७२९२००६३०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार महत्वाचे बदल करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत.जाहिरात