वसई विरार महानगरपालिके मार्फत या पदांवर निघाली भरती
VVCMC Recruitment 2023 वसई विरार महानगरपालिके मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 30 जून 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 04
रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) /
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अॅनास्थेशिया) किंवा एम.बी.बी.एस. पदवी आणि डी.ए. (डिप्लोमा इन अॅनास्थेशिया) किंवा समकक्ष पदवी. 02) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल / इंडियन | मेडीकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : 40 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना दरमहा 85,000/- रुपये पगार मिळेल.
नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 30 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.).
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती. (१० वी + १२ वी + पदनामासाठी विहित अर्हता प्रमाणपत्र).
पदनामानुसार आवश्यक असलेले महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल/ इंडियन मेडीकल कौन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती.
शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या २ सत्यप्रती.
रहिवाशी दाखल्याच्या २ सत्यप्रती.
अनुभवाचा दाखल्याच्या २ सत्यप्रती.
मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत जातीचा दाखल्याच्या २ सत्यप्रती.
जात वैधता प्रमाणपत्राच्या २ सत्यप्रती.
नॉन क्रिमिलेयर दाखल्याच्या २ सत्यप्रती.
उमेदवाराचा नजीकच्या काळातील २ रंगीत फोटो (रुंदी ३.५ सेमी व उंची ४.५ सेमी आकाराचे).
पॅन कार्डच्या २ सत्यप्रती व आधारकार्डच्या २ सत्यप्रती.