---Advertisement---

अनेक अपयश पत्करून सिध्दार्थची जिद्दीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात गगनभरारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

स्पर्धा परीक्षेकडे वळताना प्रत्येक युपीएससी उमेदवाराचा हेतू वेगवेगळा असतो, मग तो लहानपणापासूनची स्वप्ने असोत किंवा आर्थिक जबाबदारी. एका अभिमानी वडिलांनी, ज्याने नागरी सेवक म्हणून प्रशिक्षण घेतले होते आणि काम करण्याची इच्छा बाळगली होती. परंतू त्यांना कधीही संधी मिळाली नाही. त्यांच्या मुलाने ही इच्छा पूर्ण केली. सिध्दार्थचे वडील पत्रकारितेत असल्याने आझमगड, उत्तर प्रदेश येथून त्यांच्या कुटुंबासह दिल्लीला स्थलांतरित झाले. आपल्या मुलाला हिंमतीने घडवले.

सिध्दार्थ शुक्ला हा मूळचा आझमगढचा आहे. सिद्धार्थ शुक्लाने शिक्षणासाठी दिल्लीतील सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर, त्याने दिल्लीच्या खालसा कॉलेजमध्ये इतिहासाची पदवी पूर्ण केली, वर्गात अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर,त्याने आपल्या वडिलांच्या स्वप्नाचे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी सीएसईची तयारी सुरू केली. त्याची आई ही शिक्षिका तर सध्या गृहिणी आहे. तर वडील माध्यम क्षेत्रात काम करतात. त्याच्या वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलाने अधिकारी व्हावे. तेच सिध्दार्थ याने पूर्ण केले. त्यांनी तशी बरीच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तो पूर्णपणे सोशल मीडिया आणि इतर गोष्टींपासून दूर राहिला. अभ्यासक्रम, परीक्षा आणि मूल्यांकन यावर अधिक भर दिला.

---Advertisement---

सिध्दार्थ पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षेत मध्ये नापास झाला. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याला मुलाखतीत चांगले गुण मिळवता आले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात देखील मुलाखतीमध्येही अपयश आले. पण चौथ्या प्रयत्नात त्याने चांगल्या गुणांची बाजी मारली. त्याने अखेरीस CDS आणि SSB उत्तीर्ण झाल्यानंतर २०२० मध्ये CAPF चाचणी AIR २८ सह उत्तीर्ण केली. त्यांनी प्रशिक्षण सुरू केले आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) सहाय्यक कमांडंट म्हणून नियुक्ती झाली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts