---Advertisement---

अपयशातून मार्ग सापडतोच ; विशाल नाईकवाडे यांच्या यशाची गोष्ट!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून….त्यात घरची परिस्थिती बेताची पण विशाल यांच्या घरच्यांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. शेतीपेक्षा आमच्या दोन्ही भावंडांच्या शिक्षणाकडे त्यांनी आवर्जुन विशेष लक्ष दिले व त्यासाठी आग्रही राहिले. त्यामुळे, त्यांचा मोठा भाऊ डॉ.विकास नाईकवाडे वैद्यकीय अधिकारी म्हणून तर विशाल हे सध्या तहसीलदार या पदावर काम करत आहेत.

वडीलांनी कमवा व शिका योजनेतून तर कधी रोजगार हमी योजनेवर काम करून तत्कालिन . बेताच्या परिस्थितीमुळे पुढे विविध कार्यकारी सोसायटी मध्ये सचिव पदाची नोकरी पत्करली. प्रामाणिकपणे नेटाने नोकरी करत असताना त्यांनी चांगल्या संस्काराचे बाळकडू पाजले… त्याच्या सहकार्याने विशाल यांनी पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा परिवारात प्रवेश मिळाला. सुरूवातीला युपीएससीच्या मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचून कुठे तरी कमी पडत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी एमपीएससीकडे मोर्चा वळवला. त्यांचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.

---Advertisement---

मग बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरला पूर्ण केल्यानंतर पुढे कृषी पदवी साठी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे प्रवेश घेतला. विद्यापीठात पोस्ट ग्रज्युएट मुलांमध्ये काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे वातावरण होते, स्पर्धा परीक्षा मंच कार्यरत होता त्यातून त्यांनी तयारी सुरू केली.पुढे, कोल्हापूर विद्यापीठातून (सोलापूर) राज्यशास्त्र विषयात एम. ए पूर्ण केलंएमपीएससी आणि फॉरेस्ट मुलाखतीत तीन‌ वेळा अपयश आल्यानंतर मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली. काहीच नाही पासून सुरू झालेला प्रवास काहीतरी भेटलं इथपर्यंत येऊन पोहोचला होता.

परंतू, मंत्रालयात काम करताना त्यांना जाणवले की अजून अभ्यास केला तर यश मिळू शकतेच. म्हणूनच, त्यांनी जिद्दीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. या मेहनतीच्या जोरावर त्यांना चौथ्या प्रयत्नात तहसीलदार हे पद मिळाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts