---Advertisement---

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची सेवा करण्याच्या इच्छेने स्पर्धा परीक्षेची तयारी केली ; नितीन झाले आयएएस

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC IAS Success Story : नितीन शाक्य हे लहानपणापासून अभ्यासात इतके काही हुशार नव्हते.शाळेतील मुख्याध्यापकांना तो नापास होईल याची खात्री होती. पण पुढे,त्यांनी नितीन यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. ॲनेस्थेसिया आणि क्रिटिकल केअरमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन (विशेष प्रशिक्षण) घेतले. नंतर त्यांनी लोकनायक हॉस्पिटल, गुरू नानक आय सेंटर व सुश्रुत ट्रॉमा सेंटर येथून काम केले

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची सेवा करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन, नितीन यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची (सीएसई) तयारी सुरू केली.यामधून यशाची पायरी गाठली. आपण मनापासून प्रयत्न केले तर यश हे‌ मिळतेच. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास केली; पण त्यांना मुलाखतीत १० गुणांनी अपयश आले.

---Advertisement---

त्यांनी जिद्द कायम ठेवत दोन वेळा प्रयत्न केले; पण ते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या पुढे जाऊ शकले नाहीत. नितीन यांनी हार मानली नाही. आत्मविश्वास व मेहनतीच्या बळावर ते केवळ उत्तीर्णच झाले नाहीतर २०१८ मध्ये चौथ्या प्रयत्नात अखेर ते यूपीएससी परीक्षा पास झाले आणि आय.ए.एस अधिकारी बनले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts