UPSC Success Story : यशस्वी होताना आपल्या मार्गात अनेक अडथळे येतात. परंतु हे अडथळे दूर करुन जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. ही एका अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याचे बालपण गरिबी, वंचितता, ताणतणाव आणि लोकांच्या नकारात गेले. त्याच मुलाने नंतर कठोर परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आयएएस गोविंद जयस्वाल (Govind Jaiswal) यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
उत्तर प्रदेशमधील वाराणसीचे रहिवासी असलेले आयएएस गोविंद जयस्वाल यांचे वडील रिक्षा चालक होते. त्यांच्याकडे ३५ रिक्षा होत्या. परिस्थिती अशी होती की त्यांना प्रत्येक पावलावर फटकार सहन करावे लागत होते. गोविंद यांच्या आईला ब्रेन हॅमरेज झाला होता. आईच्या उपचारासाठी वडिलांनी रिक्षा विकल्या. त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. गोविंद सातवीत असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.
गोविंद यांनी फक्त सुकी चपाती खाऊन उदर्निवाह केला. त्यांच्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर केली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींनी ग्रॅज्युएशन केले. गोविंद यांनी उस्मानापुरा येथील सरकारी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर हरिश्चंद्र युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी २००६ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. ते एकावेळचे जेवण जेवायचे नाही. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय अभ्यास केला.
गोविंद यांनी ट्यूशनदेखील घेतले. त्यातून त्यांचा खर्च भागायचा. २००७ साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली अन् ते आयएएस झाले.