CID Recruitment 2025 : सीआयडीमध्ये म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती अधिसूचनेत मिळेल.
एकूण रिक्त जागा : २८
रिक्त पदाचे नाव : होमगार्ड कॅटेगरी बी टेक्निकल आणि इतर ट्रेड्स (Home Guard (Category-B – Technical & Other Trades)
आवश्यक पात्रता : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. उमेदवार हा मानसिक आणि शारिरिकरित्या फिट असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा :
या नोकरीसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महिला व पुरुष दोघांसाठीही ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची उंची १६० सेमी असावी. तर महिला उमेदवारांची उंची १५० सेमी असावी.
या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म, १०,१२वीचे मार्कशीट, शैक्षणिक प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉम्प्युटर सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी दर दिवशी ७१० रुपयाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. ही भरती आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जाणार आहे.
या नोकरीसाठीचा अर्ज तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस, सीआयडी, एपी पोलिस हेडक्वार्टर, मंगलगिरी ५२२५०३ येथे पाठवायचा आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर https://cid.appolice.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा