---Advertisement---

होतकरू आकाशची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर निवड ; साऱ्या गावासाठी ठरला अभिमान !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद गावाचा निराळा इतिहास आहे. नाशिक शहराला अगदी खेटूनच मखमलाबाद असल्याने हे गाव सध्या शहराचे एक उपनगर आहे. मखमलाबादकडे प्रवेश केल्यावर गावात प्रवेश करतो तेथे पूर्वी एक वेस होती अन् वेशीला लाकडी भव्य दरवाजे होते. या गावात बरेच अधिकारी घडले आणि घडत आहेत.याच गावचा लेक आकाश विलास काकड. या होतकरू युवकाने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी येथून आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

आकाश हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. आकाशचे शालेय शिक्षण शहरातील स्वामिनारायण शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून झाले. त्याची आई कुसुम, वडील विलास, आजी गंगूबाई आणि आजोबा दत्तात्रेय काकड हे सर्व शेती व्यवसायात आहेत. त्याच्या दोन बहिणी शिक्षण घेत असून, लहान भाऊदेखील आकाश प्रमाणेच एनडीएची तयारी करतो आहे.

आकाशने लहानपणापासूनच त्याने लष्करात अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यानुसार त्याने दहावीला असताना तछत्रपती संभाजीनगर येथील एसपीआय संस्थेत प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. मात्र तेथे त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने सुदर्शन ॲकॅडमी येथे हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए प्रवेश परीक्षा दिली. त्याच्या जडणघडणीची सुरूवात झाली. मागील अपयशाची भर काढताना ‘एनडीए’ च्या गुणवत्ता यादीत देशात ३७ वा क्रमांक पटकावला होता. ‘एनडीए’ च्या प्रशिक्षणानंतर आकाश एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आयएमए येथे दाखल झाला होता. येथून अधिकारी झाल्यानंतर आकाश त्याच्या आवडीच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल झाला. सध्या त्याची हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा येथे नियुक्ती झाली आहे.
अधिकाऱ्यांचे गाव अशी अनोखी ओळख असलेल्‍या मखमलाबाद गावाच्‍या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts