AFK Recruitment 2022 : दारुगोळा कारखाना खडकी (Ammunition Factory Khadki) येथे काही रिक्त पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : २५
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
१) अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी / Engineering Graduate Apprentices १२
शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदवी ०२) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी प्रदान करण्याचा अधिकार असलेल्या संस्थेद्वारे संसदेच्या कायद्याद्वारे पदवी ०३) केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा पदवीच्या समतुल्य
२) डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी / Diploma (Technician) Apprentices १३
शैक्षणिक पात्रता : ०१) स्टेट कौन्सिल बोर्डाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा राज्य सरकारने स्थापन केलेले तंत्रशिक्षण ०२) विद्यापीठाने दिलेला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा ०३) मान्यताप्राप्त संस्थेद्वारे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
वयाची अट: 04 नोव्हेंबर 2022 रोजी किमान 14 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: खडकी (पुणे)
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin-411 003
अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा